
पार्श्वभूमी
आपल्या भारतात दरवर्षी लाखो विद्यार्थी जेईई, सीईटी आणि नीटच्या परीक्षेला बसतात. पण यात उत्तीर्ण कितीजण होतात? या परीक्षांची तयारी करून घेणार्या क्लासेसना चक्क ‘फॅक्टरी’ म्हटलं जातं. या विषयावरच्या फिल्मस् तुम्ही पाहिल्याच असतील. पण या हजारोंच्या फॅक्टरीतून एखादाच विद्यार्थी यशाची चव का चाखतो? आणि मग बाकीच्यांचं पुढं काय होतं? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना आमचा अभ्यास पक्का होत गेला. याच अभ्यासातून लक्षात आलं की, विद्यार्थी कितीही हुशार असला तरीही फॅक्टरीच्या गर्दीत हरवून जातो. खरं तर विद्यार्थ्यांना गरज असते ती, वैयक्तिक मार्गदर्शनाची. आणि यातूनच 2016 साली स्थापन झाली कौशल्या अॅकॅडमी, जिथे पहिल्या वर्षापासून ते आजतागायत प्रत्येक बॅच आणि बॅचमधला प्रत्येक विद्यार्थी यशाचं शिखर गाठत आहे.